गडचिरोली जिल्हयात 119 कोरोनाबाधित, तर 22 कोरोनामुक्त

63

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 724 कोरोना तपासण्यांपैकी 119 नवीन कोरोना बाधित झाले असून 22 जणांंनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.  जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 31621 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30273 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 599 झाली आहे. आतापर्यंत जिल्हयात एकूण 749 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.74 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.89 टक्के तर मृत्यू दर 2.37 टक्के झाला आहे. आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 64, अहेरी तालुक्यातील 6, आरमोरी तालुक्यातील 2, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 5, धानोरा तालुक्यातील 4, एटापल्ली तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 2, सिरोंचा तालुक्यातील 2, कोरची तालुक्यातील 4, कुरखेडा तालुक्यातील 1 आणि वडसा तालुक्यातील 21 जणांंचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 22 रुग्णांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 18, चामोर्शी तालुक्यातील 1 आणि वडसा तालुक्यातील 3 जणांंचा समावेश आहे.