प्रा. संतोष होतंचंदानी आचार्य पदवीने सन्मानित

116

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविधालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक संतोष विष्णूमल होतंचंदानी यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने नुकतेच आचार्य पदवीने (पी. एचडी) सन्मानित केले.
नटवरलाल माणिकलाल दलाल महाविधालयात इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले संतोष विष्णूमल होतंचंदानी यांनी “अनिता देसाई – बहुविषयक लेखिका : एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर गोंडवाना विधापीठ गडचिरोलीला आपला शोधप्रबंध सादर केला. प्रा. होतंचंदानी यांनी लोकमान्य महाविद्यालय वरोरा, जिल्हा चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. एस. के. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध पूर्ण केला. अमूल्य मार्गदर्शनासाठी प्रा. होतंचंदानी यांनी प्राचार्य डॉ. एस. के. सिंग यांचे विशेष आभार मानले आहेत.
प्रा. संतोष होतंचंदानी यांनी आपल्या यशाचे श्रेय दिवंगत वडील विष्णूमल होतंचंदानी, कुटुंबातील सदस्य, मार्गदर्शक, शिक्षक, गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक खासदार आदरणीय प्रफुल्ल पटेल, अध्यक्षा आदरणीय वर्षाताई पटेल, सचिव आदरणीय राजेंद्र जैन, संचालक आदरणीय निखिल जैन, प्राचार्य प्रा. डॉ. शारदा महाजन, शोध प्रबंधाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. एस. के. सिंग, ऍड. इंद्रकुमार होतंचंदानी, डॉ. दीपक बाहेकर, डॉ. अंजन नायडू, डॉ. मृत्युंजय सिंग, डॉ. एन. बहेकर, डॉ. ममता प्रसाद, डॉ. कपिल सिंगेल, डॉ. संजय टप्पे, ऍड. राठोड, डॉ. हक, डॉ. चौहान, डॉ. भूमिका ठाकूर, डॉ. एस. यू. खान, डॉ. इंदिरा बुधे, डॉ. एच. जी. चौरसिया, डॉ. आलोक द्विवेदी, डॉ. माधुरी नसरे, डॉ. दिलीप जेना, डॉ. कार्तिक पन्नीकर, डॉ. धम्मपाल फुलझेले, प्रा. एस. शेख, डॉ. बनसोड, डॉ. वैभव मसराम, डॉ. इंदूरकर, डॉ. नितेश तेलहांडे, डॉ. पिंपळे, डॉ. कस्तुभ राऊत, मनीष रॉय, सुनील होतंचंदानी, सुधीर त्रिवेदी, डॉ. कल्याणी वाल्लेथ,  इंग्रजी विभागाचे सहकारी, महाविद्यालयीन सहकारी,  प्रा. अभयकुमार रॉय, प्रा. अब्रा दास, ऍड. इंद्रकुमार होतचंदानी, जयपाल होतंचंदानी, सुनील गिदलानी, कमल वाधवानी,  राम होतंचंदानी, शंकर होतंचंदानी यांना दिले आहे. प्रा. संतोष होतंचंदानी यांच्या यशाबद्दल त्यांचे मित्र, शुभचिंतक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.