एका मृत्यूसह गडचिरोली जिल्हयात 101 कोरोनाबाधित, तर 4 कोरोनामुक्त

117

– तिसऱ्या लाटेत कोरोनाचा गडचिरोलीत पहिला बळी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज, 14 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हयात 1094 कोरोना तपासण्यांपैकी 101 नविन कोरोना बाधित झाले असून 4 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एका मृत्यूमध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.20 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.42 टक्के तर मृत्यू दर 2.38 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 64, अहेरी तालुक्यातील 3, आरमोरी तालुक्यातील 5, भामरागड तालुक्यातील 2, चामोर्शी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 6, सिरोंचा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 1 आणि वडसा तालुक्यातील 10 जणांंचा समावेश आहे.