Home गडचिरोली खासदार अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

खासदार अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

229

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा नगर पंचायत निवडणूक दरम्यान खासदार अशोक नेते यांनी आज 14 जानेवारी रोजी धानोरा येथे जाऊन वार्ड क्र. 5 मध्ये बैठक घेतली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवडणुकीच्या हालचालीबाबत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी भाजपा धानोरा तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या ताराबाई कोटांगले, तालुका महामंत्री विजय कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, महादेव गणोरकर, अनंत साळवे, वार्ड क्र. 5 चे अधिकृत उमेदवार राजेंद्र श्रीपदवार, गणवीर गजपुरे, चांगदेव करकाडे, बाळू उंदिरवाडे, युवा नेते सारंग साळवे, प्रकाश मारभते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी भाजपाच्या उमेदवारांंना निवडून आणण्यासाठी व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून परिश्रम घेण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!