महामंडळ धान्य खरेदी केंद्रात ऑनलाईन सातबारा नोंदणीकरिता मुदतवाढ देण्यात यावी

84

– महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम भाग म्हणून गणला जातो. अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक भागात इंटरनेटची मोठ्या प्रमाणात समस्या असून जिल्ह्यातील तलाठ्यांचे संप सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांना महामंडळाचे धान्य खरेदी केंद्रात धान्य विक्री करिता सातबारा ऑनलाइन नोंदणी करता आले नाही. त्यामुळे सातबारा नोंदणीकरिता मुदतवाढ देण्यात यावी, असे निवेदन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नितीन कोडवते, सोशल मिडिया प्रदेश महासचिव नंदू वाईलकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, संजय चन्ने, प्रतिक बारसिंगे, नदीम नाथानी , नरेश सोरते, गौरव येप्रेद्दीवार, विपुल एलट्टीवारसह अनेक काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.