भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात शहराचा सर्वांगीण विकास : नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

118

– न. प. रामपुरी शाळेतील नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन तर आठवडी बाजार येथील दुकान गाळ्यांचे लोकार्पण

– खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते लोकार्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास जो गेल्या ३५ वर्षांंमध्ये झालेला नाही तो केवळ भारतीय जनता पार्टीच्या ५ वर्षांंच्या कार्यकाळात पूर्ण झालेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत शहरात सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, खुल्या जागेचे सौन्दर्यीकरण, नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत शहरात भूमिगत गटार लाईन, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १५१९ घरकुलांना मंजुरी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत खाजगी तसेच सार्वजनिक सौचालयाचे बांधकाम, कठाणी नदीजवळ स्मशानघाट येथे शोकाकुल सभागृह, शवदाहिनी, सौचालयाचे बांधकाम, सौन्दर्यीकरण, आठवडी बाजारात दुकान गाळ्यांचे बांधकाम तसेच विविध विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झालेले आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.

स्थानिक नगर परिषद अंतर्गत नप रामपुरी शाळेतील नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व आठवडी बाजारातील दुकान गाळ्यांचे लोकार्पण खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या.

गडचिरोली शहरात झालेले विकास कामे म्हणजे भारतीय जनता पार्टीवर नागरिकांनी दाखवलेला विश्वास आहे आणि यापुढेही भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषदेवर बसणार असून विकास कामांना पुन्हा वेग येणार असून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला नं. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, रमेशजी भुरसे, प्रकाश गेडाम, मुख्याधिकारी विशाल वाघ, नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, अल्काताई पोहनकर, नगरसेवक केशव निंबोड, अभियंता अंकुश भालेराव, मैंद, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, देवाजी लाटकर, कंत्राटदार सौरभ भडांगे व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रमोदजी पिपरे यांनी मानले.