व्यावसायिकांनी दुकान गाळ्यांचा वापर करून आपल्या व्यवसायाला गती द्यावी : खासदार अशोक नेते

103

– न. प. रामपुरी शाळेतील नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन तर आठवडी बाजार येथील दुकान गाळ्यांचे लोकार्पण

– खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते लोकार्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नगर परिषदेच्या वतीने येथील आठवडी बाजारात दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले असून आज त्याचे लोकार्पण झाले. व्यावसायिकांनी या दुकान गाळ्यांचा वापर करून आपल्या व्यवसायाला गती द्यावी, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. दुकान गाळे लोकार्पण प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास जो गेल्या ३५ वर्षामध्ये झालेला नाही तो केवळ भारतीय जनता पार्टीच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण झालेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत शहरात सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, खुल्या जागेचे सौन्दर्यीकरण, नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत शहरात भूमिगत गटार लाईन, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १५१९ घरकुलांना मंजुरी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत खाजगी तसेच सार्वजनिक सौचालयाचे बांधकाम, कठाणी नदीजवळ स्मशानघाट येथे शोकाकुल सभागृह, शवदाहिनी, सौचालयाचे बांधकाम, सौन्दर्यीकरण, आठवडी बाजारात दुकान गाळ्यांचे बांधकाम तसेच विविध विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झालेले आहेत, असे यावेळी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सांगितले.
स्थानिक नगरपरिषद अंतर्गत न. प. रामपुरी शाळेतील नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व आठवडी बाजारातील दुकान गाळ्यांचे लोकार्पण खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, मुख्याधिकारी विशाल वाघ, नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, अल्काताई पोहनकर, नगरसेवक केशव निंबोड, अभियंता अंकुश भालेराव, मैंद, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम, देवाजी लाटकर, कंत्राटदार सौरभ भडांगे व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रमोदजी पिपरे यांनी मानले.