मुद्रालोनच्या माध्यमातून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेनेे सुशिक्षित बेरोजगार युवकांना दिल्या चारचाकी वाहनाच्या चाव्या

299

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने टाटा इंट्रा चारचाकी वाहनाला मुद्रालोन योजने अंतर्गत मंजुरी दिली. सुशिक्षित बेरोजगार युवक रमनय्या नामदेव गदेपाकवार व मलरेडी पोचरेड्डी वडेट्टीवार यांना या चारचाकी वाहनांच्या चाव्या बँक व्यवस्थापक आनंद बेजनकिवार यांच्या हस्ते देण्यात आली. अहेरी येथील बेरोजगार युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी देऊन बेरोजगारीपासून सुटका केली आहे. याबद्दल अहेरी शहरवासियांकडूून बँँकेचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद अली, ताज शेख, मोहमद इस्लाम, महेश भोयर व इतर कर्मचारी उपस्थित होते.