क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मातृशक्तिने अंगिकरण्याची आवश्यकता : आमदार डॉ. देवरावजी होळी

95

– तळोधी मोकासा येथे सावित्रीच्या लेकींचा आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते सत्कार

– तळोधी (मो) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्त्री शिक्षणाचा वसा राबविणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार ही काळाची गरज असून ते विचार आजच्या मातृशक्तीने अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तळोधी मोकासा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव कार्यक्रमात केले.
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते सावित्रीच्या लेकिंचा सत्कारही करण्यात आला. सावित्रीबाई फुले या थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, भारतातील पहिल्या महिला शिक्षीका म्हणून ओळखल्या जातात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांच्या शिक्षणाला सुरुवात करून मातृशक्तीला मजबूत व सक्षम करण्याचे कार्य सुरू केले. सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आजच्या स्त्री शक्तीला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या मातृशक्तीने अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.