मेळाव्याच्या माध्यमातून तेली समाजाने एकत्र येवुन समाज शक्ती दाखवण्याची गरज : प्रमोदजी पिपरे

354

– श्री.संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्रात तेली समाजाचे लोक अगदी विदर्भापासून ते कोकणापर्यंत सर्व ठिकाणी आढळतात. महाराष्ट्रात बहुसंख्य तेली समाज असून उद्योग व्यवसायात तसेच विविध क्षेत्रात स्थिरावलेला आहे. यामुळे वधू-वर परिचय मेळाव्याद्वारे इतर जिल्ह्यातील व राज्यातील समाज बांधवांना आपल्या पाल्यांचा विवाह करण्यास सोयीचे होत आहे. समाज एकत्र होवून अनेक वधू-वरांचा परिचय सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे तेली समाज बांधवांनी वधू-वर परिचय मेळाव्यातून भावी जोडीदाराची निवड करावी. तसेच मेळाव्याच्या माध्यमातून तेली समाजांनी एकत्र येवून समाज शक्ती दाखवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नवेगाव (कॉम्प्लेक्स) गडचिरोली येथे आयोजित श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशीय संस्था गडचिरोली द्वारा आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उपवधू-वर परिचय मेळाव्यात तेली समाज बांधवांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले।.
मेळाव्यामध्ये १०८ नी आपला परिचय दिला. तसेच सामाजिक कार्यकर्ते गुणवंतांचा नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुद्देशीय संस्था गडचिरोलीच्या दिनदर्शिकेचे व स्मर्णिकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्धाटन विदर्भ तेली समाज नागपूरचे अध्यक्ष प्रा. प्रशांतजी कामडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहु. संस्थाचे अध्यक्ष भगवानजी ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणुन माजी आमदार देवरावजी भांडेकर, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, विदर्भ तेली समाज नागपूरचे सचिव प्राचार्य विठ्ठल निखूले, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे, दि.गड.जिल्हा मध्यवर्ती सह.बँक.ली.गड.चे माजी उपाध्यक्ष बलवंतराव लाकडे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, विदर्भ युवा तेली समाज नागपूर अध्यक्ष अभिनव लाकडे, रमेशजी भुरसे, वैष्णवीताई नैताम, दिनेश, अर्चना कोलते, विनोद नागोसे, मंगेश भरडकर व मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
मेळाव्याचे आयोजन घनश्याम लाकडे, प्रभाताई भरडकर, कवडूजी समर्थ, रवींद्र ठाकरे, जगदीश्वर ठाकरे, गजानन ठाकरे, नीलकंठ ठाकरे, जीवनदास कोलते, दिलीप सहारे, लताताई कोलते, कल्पना खांडखुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका ठाकरे हिने केले तर वेनुदास सहारे यांनी आभार मानले.