गडचिरोली जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची कार्यकारिणी गठीत

222

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची वार्षिक आमसभा रविवार, 19 डिसेंबर 2021 रोजी जवाहर भवन काॅम्पलेक्स गडचिरोलीच्या विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य बेलिफ महासंघाचे उपाध्यक्ष आर. एस. गौरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आमसभेत गडचिरोली जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून आर. एस. गौरकर, सचिव बी. के. खोब्रागडे, उपाध्यक्ष ए. डी. मून, सहसचिव आर. टी. फुकटे, कोषाध्यक्ष आर. एम. पठाण, ऑडिटर एल. जी. रामटेके, सल्लागार एस. के. दातार, महिला प्रतिनिधी सौ. एल. व्ही. उके यांची निवड करण्यात आली. या आमसभेला सभासद ए. एच. घोडाम, सी. एस. हनुमंते, एस. के. दातार, आर. एम. पठाण, आर. आर. दरडे, सौ. एल. व्ही. उके, एन. एल. टिंगुसले, डी. एस. धोटे, एल. जी. रामटेके, व्ही. एस. कंकडलावार आदींची उपस्थिती होती.