गळा दाबून व हात मागे बांधून युवकाची हत्या

111

– गडचिरोली शहरातील आशीर्वाद नगरातील खळबळजनक घटना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गळा दाबून व दोन्ही हात पाठीमागे बांधून युवकाची हत्या केल्याची घटना गडचिरोली शहरातील आशीर्वाद नगरात रविवार, 19 डिसेंबर रोजी रात्री घडली असून सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे गडचिरोली शहरात खळबळ उडाली आहे. सुबोध केलसडीन जनबंधू (२०) रा. आशीर्वादनगर गडचिरोली असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सुबोधचे आईवडील व लहान भाऊ रविवारी सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने सुबोध हा घरी एकटाच होता. सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास आईवडील घरी परतले असता त्यांना सुबोधचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत पलंगावर पडून असल्याचे दिसून आले असता त्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केेले. सुबोधचे हात मोबाईल चार्जरच्या वायरने मागच्या बाजूने बांधलेले होते व तोंडावर प्लाॅस्टिक असल्याचे दिसून आले. आरोपींनी सुबोधच्या घरातील आलमारी फोडून सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळेे शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.