शिवसेनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध

130

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्यांची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार कर्नाटकमधील बंगळुरू शहरात घडला. राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये व किशोर पोद्दार यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहर प्रमुख रामकिरीत यादव यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे कर्नाटक सरकारचा निषेध केला. ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेतील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसांचे दैवत नसून सकल हिंदुस्तानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुदैवी आहे, असे शिवसैनिकांनी यावेळी म्हटले आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास तमाम शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी रामकिरीत यादव, विशाल उरकुडे,अनिकेत झरकर, सूरज बाबनवाडे, दुधराम म्हशाखेत्री, विनोद खेवले, आश्रय खेवले, शुभम झरकर, कुमोद कोटगले, रूकेश कोटगले, रुपेश मंटकवार, चेतन भोयर, जयंत चुधरी,ओम पाल, कुस्माकर भोयर, कुणाल जवादे, तन्मय म्हशाखेत्री, रोशन म्हशाखेत्री, हेमंत कोटगले, विवेक कोटगले, निलेश म्हशाखेत्री, जतीन बानबले, गणेश बानबले, स्वप्नील कोटगले आदी उपस्थित होते.