गुरवळा नेचर सफारीचे जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

113

– जंगल सफारीसाठी तयार केला ५२ किमीचा मार्ग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली वनविभाग आणि संंयुक्त वनव्यवस्थापन समिती गुरवळा व हिरापूर यांच्या वतीने गुरवळा नेचर सफारी 10 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. या नेचर सफारीचेे उद्घाटन शुक्रवारी दुपारी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी गडचिरोली (प्रादेशिक) वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक डाॅ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके आदी उपस्थित होते.

हिरापूर – गुरवळा जंगल परिसरातील ५२ किमीचा मार्ग नेचर सफारीसाठी तयार करण्यात आला आहे. या सफारीमध्ये विविध प्रजातींच्या झाडांची, पक्ष्यांची आणि वन्यप्राण्यांची माहिती दिली जाणार असल्याने वन्यप्रेमींना जंगलातील माहिती मिळण्यास मदत होणार असून जंगल सफारीचा आनंदही लुटता येणार आहे.