डॉ. मिलिंद नरोटे यांनी जाणल्या जिल्ह्यातील समस्या

33

– समस्या सोडविण्याबाबत जिल्हाधिका-यांना दिले निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा जिल्हा गडचिरोलीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन जिल्हावासियांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान नागरिकांना विविध समस्या व अडचणी भेडसावत असल्याचे डॉ. नरोटे यांच्या निदर्शनास आले. या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देऊन त्या सोडविण्यात याव्यात, याबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.

जिल्ह्यात वीज पडून अनेकांचा मागील काही दिवसात मृत्यू झाला आहे. परंतु यावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्याकरिता वीज अटकाव यंत्र बसविण्यात यावे व असल्यास ते दूरस्थ करण्यात यावे, घरकुलाकरिता 5 ब्रास रेतीऐवजी 10 ब्रास मोफत रेती देण्यात यावी, घरकुलाचे अनुदान वाढविण्यात यावेत, जंगली प्राण्यांचे हल्ले व नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या नागरिकांना त्वरित शासकीय मदत देण्यात यावी व शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भाजपाचे डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.