अहेरी नगरपंचायत येथील नियमबाह्य कामांची चौकशी करून कारवाई करा : प्रशांतजी वाघरे

31

– भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वात अहेरी नगरसेवक व शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी विजयजी भाकरे यांना निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील अडीच वर्षापासुन नगरपंचायत अहेरीत नियमबाध्य व अवैध पध्दतीने कारभार सुरू आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी लोकसंख्यानिहाय व प्रलंबित महत्वाच्या समस्यांना निराकरणासाठी न वापरता केवळ विशिष्ठ क्षेत्रातच कोट्यावधीचा निधी खर्ची घालत आहेत आणि ऊर्वरित भागातील समस्या अडीच वर्षांपासून जैसे थे अवस्थेत आहे. त्याभागातील कर भरणाऱ्या नागरीकांवर हा अन्याय आहे.

आजवरच्या प्रत्येक अवैद्रय निविदा प्रक्रीयेची कंत्राटदार संघटना तथा विविध संस्थांमार्फत तक्रारी झालेल्या आहेत आणि बरेचदा जिल्हा प्रशासनाला हस्तक्षेप करून सुधारणा करावी लागली तर काही निविदा कार्यारंभ आदेश दिल्याननंतर सुध्दा प्रक्रीया रद्द करण्याची वेळ सुध्दा प्रशासनावर आलेली आहे. त्यानंतरही नगर पंचायत प्रशासन वारंवार शासकिय नियमांना व मार्गदर्शक तत्वांना डावलून मनमानी पध्दतीने मर्जीतल्या कंत्राटदारांच्या हितासाठी पायघड्या घालत असते. दोन महिण्यापूर्वी निविदा प्रक्रीयेची कागदोपत्री पुराव्यासह आपणाकडे तक्रार देण्यात आलेली होती. परंतु निवडणुक प्रक्रीयेच्या व्यस्तते आडून बेकायदेशीर पध्दतीने विकासकामे घाईघाईने आटोपण्यात आली. परंतू तक्रारीला न्याय मिळालाच नाही.

नगर पंचायत अहेरी मार्फत बेकायदेशीर ठराव सुध्दा घेण्यात आलेला असून त्या विरुध्द आपणाकड़े अधिनियम 44 (¡) नुसार अनर्हतेचे प्रकरण सुध्दा आपणाकडे न्यायप्रविष्ट आहेच. तरी या सर्व गंभीर प्रकरणांचा तेवढ्‌याध गांभिर्याने विचार करुन लवकरात लवकर न्याय द्यावा व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावे, असे निवेदन जिल्हाधिकारी विजयजी भाकरे यांना देण्यात आले.

त्याप्रसंगी नगरपंचायत गटनेत्या तथा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री भाजपा शालिनीताई पोहनेकर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मुकेशजी नामेवार, तालुकाध्यक्ष संतोषजी मद्दीवार, नगरसेवक विकास उईक, संजयजी पोहनेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्करजी बुरे उपस्थित होते.