जननायक बिरसा मुंडा चौकात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक जननायक बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांच्या १२४ वा शहिद दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक कुसूम अलाम, माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, नायब तहसिलदार वनिश्याम येरमे हे होते.

सर्व प्रथम मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या संघर्ष लक्षात घेऊन समाज एकजुटीचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपस्थित समाज बांधवांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेश उईके यांनी तर आभार प्रदर्शन सचिव प्रदिप कुलसंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय मसराम, अमोल कुळमेथे, आकाश कोडाप, कुणाल कोवे, सतिश कुसराम, देवराव अलाम, डॉ. मसराम व समाज बांधव उपस्थित होते.