Home गडचिरोली सोमनपल्ली येथील शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारक अनावरण सोहळ्याला अॕड. विश्वजित...

सोमनपल्ली येथील शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारक अनावरण सोहळ्याला अॕड. विश्वजित कोवासे यांची उपस्थिती

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : जागतिक गोंड सगा मांदी यांच्या सौजन्याने सोमनपल्ली (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथे 9 जून 2024 रोजी स्वातंत्र्यवीर शहीद राजे बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

इथल्या परिसरातील ज्वलंत प्रश्न म्हणजे जमीन अधिग्रहणाचा. परंतु आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या केंद्रातील निर्लज्ज सरकारला तुमची जमीन अनधिकृतपने अधिग्रहण करू देणार नाही. आपण सर्व एकसंग राहून सर्व धर्म समभावाची भावना जोपासून गुण्यागोविंदानं नांदाव, अशी ग्वाही सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव अॕड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी ग्रामस्थांना दिली.

यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी,  सरपंच ग्रामपंचायत सोमनपल्ली नीलकंठ पाटील निखाडे, उपसरपंच निलेश मडावी, सदस्य निनाद देटेकर, युवक काँग्रेसचे मुन्ना गोंगले, पोलीस पाटील मंगलाताई भेंडारे, संदीप नेवारे, शिक्षक बाबुराव कुलसंगे, शिक्षक ठाकूर, शेडमाके मॅडम, गणपती मोहुरले, प्रल्हाद गोडबोले, सरपंच ग्रामपंचायत ठाकरी नंदाताई कुलसंगे, व मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!