क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण

324

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : आज 9 जून 2024 ला क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 124 व्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या स्मृतिदिनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा गडचिरोली तसेच ऑल इंडिया एम्प्लॉइज फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभाग विदर्भ कार्याध्यक्ष घनश्यामजी मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया एम्प्लॉइज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष माधवरावजी गावड, जिल्हा कार्याध्यक्ष डाॕ. मिलिंदजी नरोटे, विदर्भ सचिव कैलासराव मडावी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गेडाम, महासचिव गंगाधरजी मडावी, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शेडमाके, विकास परिषद कर्मचारी सेलचे डॉ. होमराज मसराम, विकास परिषद संघटक नरेश कोडापे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

आपले मनोगत व्यक्त करताना घनश्यामजी मडावी म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. अवघ्या 25 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्यास इतिहासात तोड नाही. धर्मांतर,शोषण व अन्यायाविरुद्ध लढा देणारे भगवान बिरसा मुंडा एक महान क्रांतिकारक होते. त्यांचे कार्य आदिवासी समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहील.

स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतरही आदिवासी समाज मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याने अन्याय अत्याचाराविरोधात करण्यासाठी आदिवासींनी संघटित होण्याची गरज आहे. समाजाला पुढे नेण्यासाठी आदिवासी बांधवांनी एकत्रीत येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आदिवासी कर्मचारी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, वीर शहीद भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी सर्व समाजाला एकत्र येण्याचा नारा दिला. आदिवासी समाजाला आत्मसन्मान जागृत केल्या. आज आदिवासी समाज जागृत होऊन न्याय हक्क शोषण अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर येऊन लढा लढत आहे. एवढे उपकार आदिवासी समाज कधीच विसरू शकत नाही. अशा पुण्य जननायक भगवान बिरसा मुंडांना विनम्र अभिवादन करताे, असे ते म्हणाले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ही एकमेव संस्था जी फक्त आदिवासी समाजाकरिता शैक्षणिक आरोग्य विकासाच्या दृष्टीने काम करीत आहे. सर्व सदस्य पुढील वर्षात सर्व समाज बांधवांपर्यंत कसे पोहोचता येईल याबद्दल सविस्तर चर्चा केली. आमचे एकच ध्येय म्हणजे आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हे होय.

आजच्या कार्यक्रमास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सचिव गजेंद्र गेडाम, सचिव निलेश कोडापे, सदस्य शांताराम मडावी, सदस्य मधुकर कन्नाके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महासचिव गंगाधरराव मडावी यांनी सर्वांचे आभार मानून जलनायकाने केलेल्या कार्याची माहिती दिली.