आमदार डॉ. देवरावजी होळी यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

33

– रुग्णांची केली आस्थेने विचारपूस

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी 1 जून राेजी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध वार्डात जावून भरती असलेल्या रुग्णांसोबत संवाद साधला व त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची यथायोग्य काळजी घेण्याची सूचना केली. याप्रसंगी जिल्हा सह शल्यचिकित्सक डॉ. सोळंकी व वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.