विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, सी. डी. नळे, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, वर्षा मस्के, व्ही. एस. देसू, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम,आय. एम. कुमरे, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, अभय कांबळे, करिष्मा गोवर्धन, सुनिता दुर्कीवार आदी उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकाचे सर्वांनी सामूहिक वाचन केले. मान्यवरांनी संविधानाबद्दल माहिती देऊन संविधानाचे महत्त्व सांगितले व मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी यांनी केले.