विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील नरचुली येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षणभिंतीचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच पिंगला हलामी, परसरामजी टिकले, भूपेशजी कोलते, विश्वेश्वर दर्रो व इतर मान्यवर, खेळाडू तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.