विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विजयी प्राप्त केल्याने या विजयामागे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांचे नेतृत्व मोलाचे निर्णायक ठरले.
याकरिता आज २९ नोव्हेंबर रोजी अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची भेट घेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करत विजयी आनंद साजरा केला.
यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, भाजपाच्या जिल्हा सचिव रंजिता कोडाप, झोपडपट्टी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते श्याम वाढई, मानवाधिकार संघटनेचे महिला जिल्हाध्यक्षा मनिषा उईके, कार्यकर्ता गण उपस्थित होते.
गडचिरोलीतील हा विजय भाजपा आणि जनतेच्या विश्वासाला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे. याप्रसंगी मा. खा. नेते यांनी संपुर्ण जनता जनार्दनांचे तथा भाजपा महायुतीतील पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.