घोटाळेबाज काँग्रेसला हद्दपार करून विकासाला मत द्या

26
Oplus_131072

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा धानोरा तालुक्यात प्रचाराचा झंजावात

– महायुतीचे उमेदवार खा. अशोक नेते यांच्यासाठी गावागावात जाऊन मागितले एक एक मत*

– धानोरा तालुक्यातील चव्हेला, सालेभट्टी, पावणीटोला, धानोरासह अनेक गावागावांत प्रवास

– उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सभेला येण्याचे गावकऱ्यांना आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेसने आपल्या सत्ता काळामध्ये देशात घोटाळ्यावर घोटाळे करून देशात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यासारख्या अनेक समस्या निर्माण केल्या. मात्र नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशात सरकार स्थापन झाल्यानंतर देश विकासाकडे वाटचाल करू लागला त्यामुळे भ्रष्टाचारी घोटाळेबाज काँग्रेसला हद्दपार करून विकासाकडे नेणाऱ्या भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी धानोरा तालुक्यातील गावांमध्ये केलेल्या बैठकांच्या माध्यमातून केले.

धानोरा तालुक्यातील चव्हेला, सालेभट्टी पावणीटोला, धानोरासह अनेक गावागावात जाऊन महायुतीचे उमेदवार खा. अशोकभाऊ नेते यांच्यासाठी एक एक मत मागितले. १४ एप्रिल रोजी धानोरा येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या जाहीर सभेला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी या प्रचाराच्या प्रसंगी केले.