विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : पेंढरी- गट्टा जवळील मौजा चिचोडा येथे एकता नवयुवक क्रीडा मंडळ चिचोडा यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कबड्डी व व्हालीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आले. या भव्य ग्रामीण कबड्डी व व्हालीबॉल स्पर्धेचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते पार पडले.
ग्रामीण भागातील खेळ किंवा कोणतेही सामाजिक कार्य हे एकतेने केलं जातं. म्हणून ग्रामीण हा भाग खेळीमेळीच्या वातावरणात भेद भाव न करता सर्वांनी सहकार्य करत कार्य पुर्ण सुरळीत पार पाडतात. असाच आपण सर्वांनी आपला गाव विकासासाठी प्रयत्न करावे. अश्या माध्यमातून आपलं गावात एकतेचे प्रतीक दिसून येते. असे यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी मार्गदर्शनातून केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केसरी पाटील उसेंडी, सरपंच प्रियंका आतला, ग्रा. प. चे सदस्य रामसाय पाटील आतला, गाव भुमिया अशोक पा. आतला, महादेव मडावी, गणेश आतला, हरिदास आतला, आदी मान्यवर,गावकरी मंडळी व खेळाडू उपस्थित होते.





