कुथेगाव येथील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांची उपस्थिती

29

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुथेगाव येथे भगवान बिरसा मुंडा नवयुवक मंडळ कुथेगाव आयोजित ग्रामीण कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा पार पाडले.

याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी गावात विविध विभागातील शासकीय कर्मचारी लाभले आहेत. ते शासकीय कर्मचारी गावाचा विकासाचा पाया आहे. गावात विविध कार्यक्रमात सहभागी होत शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुध्दा गावाचा विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्न करत राहावे. तसेच गावातील विद्यार्थी युवक मंडळींना मार्गदर्शन करून शिक्षणाकडे आकर्षित करावे. जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जो शिक्षण घेईल तो आपला जीवनाचा आधार बनेल, असे म्हणत ग्रामस्थ व ग्रामीण कबड्डी स्पर्धेत भागातील सहभागी संघांना शुभेच्छा देत संबोधित केले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, किशोर पाटील कोवासे, नामदेव पोटावी, माजी सरपंच किरंगे, माजी सरपंच मारोती भांडेकर, साहिल वडेट्टीवार, गेडाम, आशिष गेडाम आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.