प्रत्येक गावात वाचनालय झाला पाहिजे : विश्वजित कोवासे

30

– मक्केपल्ली येथे सल्लागागरा शक्ती अनावरण व कोया पूनेम गोंडी धर्म संमेलन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वेगवेगळया प्रकल्पाच्या माध्यमातून  केंद्राची आणि राज्याची सरकार आदिवासी समाजाची जमीन आणि त्यांचा निवारा हिसकावण्याच्या काम करीत आहे. परंतू जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत यांच्या प्रयत्न सफल हाऊ देणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव एड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केले.

कोवासे पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात वाचनालय झाला पाहिजे हाच माझा संकल्प आहे. जेणेकरून प्रत्येक गावातील  आदिवासी युवक हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि स्वतःच्या अधिकारापासून दूर राहणार नाही हाच खरा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

18 फेबूरवारी 2024 रोजी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके गोटुल समिती पुसगुडा मक्केपल्ली चक नंबर 3 (ता. चामोर्शी) येथे सल्लागागरा शक्ती अनावरण व कोया पूनेम गोंडी धर्म संमेलनाचे अयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, रामदास पुंगाटी अध्यक्ष पारंपारिक ग्रामसभा इलाका घोट, जे. बी. गेडाम सल्लागार ऑल इंडिया फेडरेशन चामोर्शी, प्रभाकर येरमे, प्रशांत पोयाम अध्यक्ष, सुधाकर गेडाम सरचिटणीस, दिपक आत्राम कोशाध्यक्ष, उमेश कुमरे वालसरा, नितेश भाऊ राठोड युवक काँग्रेस उपाध्यक्ष गडचिरोली, जैलाबाई कुलेटी ग्रामपंचायत सदस्य, अरुण बावणे, श्यामराव पेंदोर वाघदरा, मायाबाई मडावी गडचिरोली, अनुप हलदर, नरेश शेट्टे, कोडापे मॅडम, गौराबाई गावडे सरपंच विसापुर, जैलाबाई कुलेटी, सिताराम मंनो, फकरी नरोटे, तिम्मा सर आणि मोठ्या संख्येने गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.