इंदिरानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

147

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील इंदिरानगर वार्डात दि. १९ फेब्रुवारी रोजी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर व रमाई महिला मंडळ इंदिरानगर यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवकुमार मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र ऊईके, तथागत बौध्द समाज मंडळाचे अध्यक्ष सतिश भानारकर, शोभा गजघाटे, राकेश सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात भगवान बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मालार्पण व मेणबत्ती लावुन केली. सर्व उपस्थित उपासक – उपासिका यांनी बुध्द वंदना ग्रहण केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक सचिन पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर माहीती सांगून मार्गदर्शन केले.

इंदिरानगर येथील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत इंदिरा गांधी नगर परिषद शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला इंदिरानगर येथील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगर व रमाई महिला मंडळ इंदिरानगर चे सदस्यांनी सहकार्य केले.