Home गडचिरोली कळमटोला येथे हैरान नाटकाचे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्धाटन

कळमटोला येथे हैरान नाटकाचे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्धाटन

122

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे बालमित्र गणेश मंडळ कळमटोला यांचे सौजन्याने ‘‘हैरान’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो, शेतीची मळणी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आज कळमटोला येथे बालमित्र गणेश मंडळाच्या सौजन्याने ‘‘हैरान’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार हे होते.

याप्रसंगी यादवजी लोहबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकुर, देवेंद्र जांभुळकर, छत्रपती ठाकरे, मुखरू मुंडरे, साहिल जांभुळकर, रेवनाथजी उंदीरवाडे, राजू ठाकरे, बापू सहारे, सोमनाथ ठाकरे, लोकचंद ढोणे, ज्ञानदेव ठाकरे, विनीत ठाकरे, गोकुलदास ढोणे, प्रणित सहारे, छत्रपती करकडे आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!