Home गडचिरोली भाजपा गडचिरोली शहर पदाधिकाऱ्यांची बुथ संयोजक व प्रवासी कार्यकर्ता नियोजनात्मक बैठक संपन्न

भाजपा गडचिरोली शहर पदाधिकाऱ्यांची बुथ संयोजक व प्रवासी कार्यकर्ता नियोजनात्मक बैठक संपन्न

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर पदाधिकारी यांची बुथ संयोजक व प्रवासी कार्यकर्ता नियोजनात्मक बैठक स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली व लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, विधानसभा विस्तारक दामोधरजी अरगेला, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या बैठकीमध्ये गडचिरोली शहरातील ४२ बुथावर वार्ड (बुथ) संयोजक व प्रवासी कार्यकर्ता यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रवासी कार्यकर्ता यांनी बुथ रचना तयार करणे, केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती तेथील नागरिकांपर्यंत पोहचविणे. तसेच गांव चलो अभियानाअंतर्गत बरेच कामांचे लक्ष्य प्रवासी कार्यकर्ता यांना देण्यात आले आहे.

बैठकिला युवा मार्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री विवेक बैस, शहर महामंत्री नरेश हजारे, प्रा. अरुण उराडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, वैष्णवी नैताम, निताताई उंदिरवाडे, राजू शेरकी, देवाजी लाटकर, रामन्नाजी बोण्डकुलवार, प्रशांत अमलपटलावार, रश्मीताई बानमारे, अर्चना चन्नावार, पल्लवी बारापात्रे, बेबीताई चिचघरे, अर्चना निंबोळ, ज्योती बागडे, शामराव वाढई, संजय बोधलकर, युवराज बोरकुटे, भांडेकर भाजपा शहर पदाधिकारी व शहरातील बुथ प्रमुख उपस्थितीत होते.

error: Content is protected !!