– मोहगाव, झाडापापडा व तळोधी (मो.) येथील सिमेंट रस्ता व सभागृहाचे भूमिपूजन तर मोहगावच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तळोधी मो. येथील संत जगनाडे महाराज सभागृह 10 लक्ष रु., मोहगाव इलाखा ग्रामसभा सभागृह 10 लक्ष रु., झाडापापडा येथील सभागृह 20 लक्ष रु., सिमेंट रस्ता बांधकामाकरिता 12 लक्ष रु. आदी विकास कामांचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच मोहगाव येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आहे.
याप्रसंगी सरपंच पप्पू येरमे, सरपंच कांडेराम उसेंडी, उपसरपंच धनराज धनेलिया, ग्रामसभा अध्यक्ष देवसाय पाटील आतला, ग्रामसभा सल्लागार बावसू पावे, जितूभाऊ कुनघाडकर, मोहन चिलंगे, सरपंच परमेश्वर गावडे, दिनेश टेकाम मनोज आतला, काशिनाथ आतला, माणिक हिचामी सावगा, वसंत तुलावी केसनीर, सुध्दाम पवार, धनेश पवार, रामभाऊ नाईक, सीताराम खुदराम, राधेश्याम नाईक, यशवंत पोटवार, बारसू दुगा व ग्रामस्थ उपस्थित होते.







