Home गडचिरोली डीपीडीसीच्या सदस्यपदी राकॉंच्या चार जणांची निवड

डीपीडीसीच्या सदस्यपदी राकॉंच्या चार जणांची निवड

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री (नियोजन) यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी (डीपीडीसी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते ऋतुराज हलगेकर, कोडान्ताधारी (नाना) नाकाडे, लिलाधर भरडकर व रवींद्र वासेकर या चार जणांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून निमंत्रित करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव यांना केली आहे. त्यामुळे या चार जणांची डीपीडीसीच्या बैठकीसाठी उपस्थिती असणार आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री यांनी १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठविले आहे. यापुढे होणाऱ्या गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी हलगेकर, नाकाडे, भरडकर व वासेकर यांना निमंत्रित करण्याबाबतचे पत्र उपसचिव (महाराष्ट्र शासन) नि. भा. खेडकर यांनी जरी केले आहे. सदर निवडीबाबत सदस्यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आभार मानले आहे.

error: Content is protected !!