विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मनेराजाराम येथील जय गोंडवाना कबड्डी क्लब मंनेराजाराम यांच्या वतीने भव्य ‘अ’ गट व ‘ब’ गट असे ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय ककंडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अधक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ ककंडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनेराजारामचे सरपंचा शारदा कोरेत तर प्रमुख पाहुणे म्हणून मडवेलीचे सरपंच मलेश तलांडे, ग्रा. प. येचलीचे उपसरपंच संजय येजूलवार, ग्रा. प. मनेराजारामचे उपसरपंच मनीषा मडावी, मडवेलीचे उपसरपंच परमेश मडावी, चिंनुभाऊ सडमेक, प्रभाकर मडावी, गणेश नागापुरे, श्रीनिवास कुंदावार, सीताराम पेंदाम, प्रभाकर सडमेक, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, राकेश सडमेक, सोमजी पेंदाम, अजित पेंदाम, आशिष सडमेक, सचिन सडमेक, साईनाथ पेंदाम, करण पेंदाम, महेश पेंदाम, अविनाश पेंदाम, आशिष मडावी, रवींद्र सडमेक, नकुल आलम, अजय सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक अ गटासाठी 21001 रुपये व ब गटासाठी 21001 रुपये देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून अ गटाला 15001 रुपये व द्वितीय पारितोषिक श्री. बि. एल. मडावी यांच्याकडून ब गटाला 15001 रुपये देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक रुद्राक्ष रवी पेंदाम यांच्याकडून अ गटाला 10001 रुपये तसेच तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत कार्यालय मनेराजाराम यांच्या कडून ब गटाला 10001 रुपये असे तीन – तीन अ गट आणि ब गटाला पारितोषिक देण्यात येत आहे. या कबड्डी स्पर्धेसाठी परिसरातील विविध गावांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला आहे. मंडळचे अध्यक्ष प्रवीण पेंदाम, उपाध्यक्ष सोनू सडमेक, सचिव आर्यन सडमेक, कोषाध्यक्ष संतोष मडावी, क्रीडाप्रमुख राहुल पेंदाम यांच्यासह परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.







