Home गडचिरोली आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार

आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे संलग्नित सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्था देसाईगंज यांच्या वतीने ‘पेन्शनर्स डे’ निमित्त सत्कार समारंभ १७ डिसेंबर २०२३ रोजी श्री गजानन महाराज मंदिर देसाईगंज येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे उपस्थित राहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गजबे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष शालुताई दंडवते, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधरजी सौंदरकर, सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्थेचे अध्यक्ष आर. एस. सोयाम, कार्याध्यक्ष के. ए. खान, उपाध्यक्ष एल. डी. नागदेवते, कोषाध्यक्ष पी. पी. शिंदे, सचिव बी. डी. सांगोळे, सहसचिव व्ही. पी. फुलबांधे, सदस्य जे. एस. रासेकर, सदस्य व्ही. जी. गोस्वामी, सदस्य के. एम. नाकतोडे, सदस्य एम. एस. माडावार, सदस्य एन. के. मेश्राम, सदस्य एन. एस. नेवारे, सदस्य एस. एस. बुल्ले, सेवानिवृत्त कर्मचारी बंधू तसेच शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!