दंडार हे सामाजिक प्रबोधनाचे माध्यम : ॲड. विश्वजित कोवासे

42

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दंडार हे सामाजिक प्रबोधनाचे माध्यम असून यातून जनतेने चांगला उद्बोधन घ्यावे. जे चांगले असेल ते आत्मसात करा आणि जे वाईट असेल ते सोडून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजित कोवासे यांनी केले. गडचिरोली तालुक्यातील पुलखल येथे श्री गुरुदेव महिला मंडळाच्या सौजन्याने 3 अंकी दंडारीचे आयोजन करण्यात आले होते. या दंडारीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

या दंडारीचे उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेवजी किरसान, पूलखलच्या सरपंचा  सावित्रीबाई गेडाम, उपसरपंच रूमनबाई ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य ठाकरे, युवक काँग्रेसचे नितेशजी राठोड आदी उपस्थित होते.