विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा : खा. अशोक नेते

26

– मुरमाडी येथे खा. नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२३ ला भगवान बिरसा मुंडा यांच्या गौरव दिनाचे औचित्य साधून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला. या निमित्याने ३० नोव्हेंबर २०२३ ला गडचिरोली पं. स. अंतर्गत येणाऱ्या मुरमाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने खासदार अशोक नेते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून या यात्रेचा शुभारंभ केला. नववर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने घेतलेलेे ऐतिहासिक निर्णय व अनेक लोकोपयोगी, लोकहिताचे, लोककल्याणासाठी केलेल्या कार्यान्वित केंद्र शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहचवून ज्यांना आतापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही. अशांना या माध्यमातून सदर केंद्र शासनाच्या योजनांची थेट माहिती व लाभार्थ्यापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रकारचे माध्यम आहे. यात ३५०० हून अधिक वनधन विकास केंद्र, २०२६ पर्यंत ७४० एकलव्य विद्यालय सुरू करण्याचे ध्येय, आदिवासी समुदायाचे सक्षमीकरणात १.१ लाख कोटीची तरतूद, वन अधिकार अधिनियम, पीएम किसान सन्माननिधी अंतर्गत १ कोटी आदिवासी परिवारांना लाभ यात अनेक योजनांचा समावेश असून विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप खासदार अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, तहसीलदार गणवीर, सरपंच भोगेशवर कोडाप, पशुधन विकास अधिकारी डॉ. लेखामी, वैद्यकीय अधिकार डॉ. नरोटे, शाळा व्य. स. अध्यक्ष सचिन भुसारी, सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोयर, यशवंत डोईजड आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत वाघरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार गणवीर यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, बंधू भगिनी, आशा वर्कर, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.