Home गडचिरोली खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते गडचिरोली येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते गडचिरोली येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

105

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासकीय आधारभूत किंमत खरिप हंगाम सन-२०२३ -२४ अंतर्गत भात (धान्य) खरेदी केंद्राचा शुभारंभ भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते गडचिरोली या ठिकाणी पार पडला. या धान्य खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी खासदार अशोकजी नेते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू केले आहे. या अनुषंगाने ३० नोव्हेंबर २०२३ ला शासकीय आधारभूत किंमत खरिप हंगाम भात (धान्य) खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला यांचा लाभ गडचिरोली परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी केले.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपा कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, गडचिरोली भाजपा तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, संचालक जि. म. बँकेचे खेमनाथ पा. डोंगरवार, भाजपा जिल्हा सचिव गणपतराव सौनकुसरे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष व्यंकटजी नागीलवार, उपसभापती डॉ. बळवंतराव लाकडे, तालुका महामंत्री बंडू झाडे, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!