Home गडचिरोली चामोर्शी व धानोरा तालुका क्रीडा संकुलासाठी निधी द्या

चामोर्शी व धानोरा तालुका क्रीडा संकुलासाठी निधी द्या

116

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची क्रीडामंत्री संजयजी बनसोडे यांच्याकडे केली मागणी

– गडचिरोली जिल्हा स्टेडियमच्या बांधकामाच्या संदर्भात चौकशी करण्याचे मंत्र्यांनी दिले आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी, धानोरा तालुका क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांची मुंबई मंत्रालयात जावून भेट घेतली.

याप्रसंगी त्यांनी गडचिरोली जिल्हा स्टेडियम बांधकामात होत असलेला विलंब व कामाचा दर्जा यासंदर्भात मंत्री महोदयांना अवगत करून दिले असता त्यांनी या संदर्भात लवकरच चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!