– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
विदर्भ क्रांती न्यूज
अहेरी : समाजात एकता व संघटितपणा असल्यास त्या समाजाची प्रगती व विकास कोणीही रोखू शकत नाही. समाजाचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन करित कुणबी समाज भवनासाठी भरीव मदत करण्याची ग्वाही माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली.

अहेरी येथील राजे धर्मराव कृषी विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी २९ ऑक्टोबर रोजी अखिल कुणबी समाजाच्या कोजागिरी निमित्य स्नेहमीलन सोहळा व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला, त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. च्या माजी अध्यक्ष आशाताई पोहणेकर होत्या. सत्कारमूर्ती म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जयश्री खोंडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चंद्रपूर येथील परिचारिका पुष्पा पाचभाई, दिनकर जिवतोडे, वामन देवाळकर, विठ्ठल नागापुरे, महादेव मस्की, जीवनराव गोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून कुमार अवधेशराव बाबा आत्राम, पोलिस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, प्रा. डॉ. संतोष डाखरे आदी उपस्थित होते. तत्पुर्वी समाजाच्या वतीने राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमुर्तीसह इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.







