Home गडचिरोली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी प्रमोदजी पिपरे यांची प्रमुख...

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी प्रमोदजी पिपरे यांची प्रमुख उपस्थिती

144

– चिमूर विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यात नेरी येथील कार्यक्रमाला उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मा. पंतप्रधान यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर ५०० कौशल्य विकास केंद्र मंजूर केले. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील युवक – युवतींना रोजगार क्षेत्रात उपयुक्त कौशल्य आत्मसात करून तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या या ग्रामीण स्तरावरील कौशल्य विकास केंद्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील नेरी येथील त्रिनेत्र पदुम कृषी व ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत युवाचेतना टेक्नीकल इन्स्टीट्युट, वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मंगल कार्यालय येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, विश्वगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम स्क्रीनवर बघितला. याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे हे चिमुर विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर असताना प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली भाजपा जिल्हा महामंत्री सौ. योगीताताई पिपरे, उपविभागीय अधिकारी चिमूर घाडगे, उपविभागीय अधिकारी सिंदेवाही महाजन, नायब तहसीलदार पवार, बिडीओ राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. श्यामजी हटवादे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा जि. प. सर्कल प्रमुख संदीप पिसे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!