– गडचिरोली येथे दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमात उपस्थितांना केले मार्गदर्शन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्या योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी गडचिरोली येथे दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमात उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी मंचावर दिव्यांग कल्याण विभागाचे राज्याचे अध्यक्ष ना. बच्चूभाऊ कडू, आमदार डॉ देवराव होळी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा, जि. प. गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य सरकारने दिव्यांगाच्या कल्याणाची जबाबदारी मा .बच्चुभाऊ कडू यासारख्या योग्य माणसाकडे दिली असून त्यांनी आपल्या या कारकीर्दीत दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी काम केले आहे. दिव्यांग बांधवांनी देखील शासनाच्या योजना समजून घेऊन त्या योजनांचा लाभ घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार गजबे यावेळी म्हणाले.






