वर्षाताई शेडमाके यांच्या निवडीबद्दल आदिवासी विकास परिषदेने केले अभिनंदन

48

– पुढील वाटचालीकरिता दिल्या शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिवपदी माजी नगरसेविका वर्षाताई शेडमाके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

वर्षाताई शेडमाके ह्या मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात काम करीत आहेत. मागील काळात त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या कामाची पक्षाने दखल घेऊन भाजपच्या जिल्हा सचिवपदी त्यांची निवड केली आहे. त्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ शाखेतर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.