Home गडचिरोली आमदार कृष्णाजी गजबे यांनी केली अपघातग्रस्ताला मदत

आमदार कृष्णाजी गजबे यांनी केली अपघातग्रस्ताला मदत

137

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी वडसा ते कुरखेडा मार्गावरील विसोरा गावालगत अपघातग्रस्त विश्वनाथ मडावी यांना मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

आपुलकी व जिव्हाळाची मतदार संघातील व्यक्ती हा आपला व्यक्ती असल्याचे समजून मतदारसंघात कुठेही समस्या निर्माण झाली तर सदैव मदतीचा हात आमदार कृष्णाजी गजबे‌ हे पुढे करीत असतात. यावेळी सुद्धा त्यांनी अपघातग्रस्ताला मदतीचा हात दिला. आ. गजबे हे कुरखेडा येथील ईद ए मिलादचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना वडसा ते कुरखेडा रस्त्यावरील विसोरा गावालगत अपघात झाल्याचे दिसून आले. विश्वनाथ मडावी (मु. डोंगरमेन्ढा) व सोबत त्याची मुलगी हे रस्त्याने प्रवास करत असताना जंगली माकडे आडवे आले असता त्यांचा अपघात झाला. आमदार कृष्णाजी गजबे यांनी गाडी थांबवून त्यांना मदत केली व लगेच त्यांना विसोरा येथील नाकाडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

error: Content is protected !!