Home गडचिरोली आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे : अजय कंकडलावार

आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे : अजय कंकडलावार

122

– आविसं विदर्भ नागपूरतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ सप्टेंबर : आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची ABCD ही पुस्तक विध्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात येत आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास निश्चितच उच्च अधिकारी होऊ शकतात, असा आशावाद आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी व्यक्त केला.

अहेरी तालुक्यातील SB कॉलेज अहेरी आणि राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर जिल्हा गडचिरोली व मिशन IAS अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या शिबिराला मुख्य मार्गदर्शक IAS अकॅडमी अमरावतीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व आविसंचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे हे होते.

यावेळी डॉ. नरेशचंद्र कठोडे म्हणले की, शेतकऱ्यांची मुले सुद्धा IAS अधिकारी होऊ शकतात त्यासाठी दररोज वर्तमान पत्रा वाचावे व रोजचा अभ्यास रोज करावे. तात्परता, तेजस्विता व तपस्विता या गुणांचा अंगीकार केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते. नंदुभाऊ नरोटे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची ABCD या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यामागचा उद्देश हाच आहे कि गडचिरोली जिल्ह्यातील एक तरी विद्यार्थी IAS होऊन या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून आला पाहिजे. यावेळी माजी जि. प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!