Home गडचिरोली रक्तदानातून अनेकांना मिळतो जीवनदान : आमदार डॉ. देवरावजी होळी

रक्तदानातून अनेकांना मिळतो जीवनदान : आमदार डॉ. देवरावजी होळी

173

– भाजपा तालुका चामोर्शी व संत निरंकारी मिशनच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : रक्ताचा प्रत्येक थेंब जीवनासाठी अत्यंत उपयोगी असून आपण केलेल्या रक्तदानातून कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या जीवनाला जीवनदान मिळत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी व संत निरंकारी मिशनच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी भाजपाचे लोकसभा प्रमुख तथा संत निरंकारी मिशनचे प्रमुख किसनजी नागदेवे, भाजपा तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री यांच्यासह निरंकारी मिशनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिवसापासून म्हणजे १७ सप्टेंबरपासून ते गांधी जयंती २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन सुरू असून चामोर्शी येथे संत निरंकारी मिशन व भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.

error: Content is protected !!