Home गडचिरोली खा. अशोक नेते यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन

खा. अशोक नेते यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन

131

– नवेगाव (मुरखळा) येथे ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ सप्टेंबर : देशाचे विश्वगौरव, सक्षम नेतृत्व, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ १०५ व्या भागाचे प्रक्षेपण झालेला कार्यक्रम गडचिरोली तालुक्यातील नवेगाव (मुरखळा) येथील ग्रामपंचायत प्रभागातील बुथ क्रमांक १३० व १३१ या बुथावर थेट प्रसारण करुन पाहण्यात आला. पंतप्रधान आपल्या ‘मन की बात’ मध्ये देशात सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी गोष्टी ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी पटलावर आणतात. आज सुद्धा मोलाचे मार्गदर्शन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले.

‘मन की बात’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर तपासणीचा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या टिमच्या वतीने आयोजित करण्यात आले. या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव (मुरखळा) येथे तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशयाचा, मुखाचा, कर्करोगाची पूर्व तपासणी, बीपी, शुगर अशा विविध आरोग्याची तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या तपासणी शिबिराचे उद्घाटन खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी स्वतः शुगर, बीपी तपासून केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रदेश सरचिटणीस एस. टी. मोर्चाचे प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसरपंच राजू खंगार, युवा मोर्चाचे महामंत्री अनिल तिडके, भाजपा युवा कीर्तीकुमार मासुरकर, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, हर्षित सहारे, निखिल सुंदरकर, निखिल चरडे तसेच सिस्टर आरोग्य शिबिरातील कर्मचारीवर्ग, गावातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!