Home गडचिरोली पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत : आमदार कृष्णाजी गजबे

पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत : आमदार कृष्णाजी गजबे

125

– पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे आयुष्यमान भव: कार्यक्रम संपन्न

– आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते आयुष्यमान कार्डचे वाटप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. केंद्राने 2018 पासून या योजनेला सुरूवात झाली. कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. ‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात, असे प्रतिपादन आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे आयुष्यमान भव: कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, माजी नगराध्यक्ष शालूताई दंडवते, आरोग्य सेवा नागपूरच्या उपसंचालक डॉ. प्रांजलताई वानरे, जिल्हा आरोग्य अधिकारी साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, आरोग्य अधिकारी डॉ. धुर्वे, डॉ. अविनाश मिसार, डॉ. ठाकरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रमोद झिलपे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!