Home गडचिरोली लॉयड्स मेटल्स सुरजागडतर्फे ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकींग कोर्सला नागपूरला...

लॉयड्स मेटल्स सुरजागडतर्फे ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकींग कोर्सला नागपूरला रवाना

157

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, डोगराड, नक्षलग्रस्त, आदिवासी अविकसित म्हणून ओळखलं जातो. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी युवक -युवतींना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स, लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनच्या वतीने ऑस्ट्रेलियाला माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांना इंग्रजी सुरळीत बोलता याव यासाठी नागपूर येथे इंग्रजी स्पीकींग कोर्सचे शिक्षण घेण्याकरिता पाठविण्यात आले आहे.

या विद्यार्थ्यांचे नागपुरातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांना एडवांस कोर्स घेण्याकरिता दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. दोन्ही कोर्सेस पुर्ण झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्याकरिता ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार आहे. नागपुरला पाठवित असताना विद्यार्थ्यांचे पालक व लॉयड्स मेटल्सचे अधिकारी व कर्मचा कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना एटापल्लीवरुन नागपूरकरिता रवाना करण्यात आले.

error: Content is protected !!