Home गडचिरोली भाजपाच्या वतीने रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्डचे...

भाजपाच्या वतीने रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्डचे वितरण

122

– पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह पंधरवाडा’ कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 23 सप्टेंबर : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह पंधरवाडा’ या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा हनुमान वार्ड आठवडी बाजार येथे भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर तसेच मोदीजींच्या 9 वर्षे कार्यकाळातील विविध कामांची माहिती असलेली चित्रफीत दाखविण्यात आली. आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, लोकसभा विस्तारक तथा जेष्ट नेते बाबुरावजी कोहळे, महिला आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, एस. टी. मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, महामंत्री विनोद देवोजवार, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, माजी नगरसेविका लताताई लाटकर, कोमल बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, विलास नैताम, आशा सेविका, आरोग्य सेविका, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्डधारक लाभार्थी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!