Home गडचिरोली राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून सिरोंचा येथील गणेश मंदिराला भजन सामग्रीकरिता 30 हजारांची...

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून सिरोंचा येथील गणेश मंदिराला भजन सामग्रीकरिता 30 हजारांची मदत

121

– भाजपाच्या ‘सेवा पंधरवाडा’ निमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्रात सेवाभावी कार्य सुरू

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २३ सप्टेंबर : भारत देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरपर्यंत भाजपाचा ‘सेवा पंधरवाडा’ म्हणून देशभरात सेवाभावी कार्य करत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्यातर्फे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात सामजिक कार्य सुरू आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, रुग्णसेवा, अन्नदान, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान, गरजूंना आर्थिक मदत अशाप्रकारे अनेक सेवाभावी कार्य मोठ्या उत्साहात सुरू आहेत. त्या निमित्ताने सिरोंचा येथील गणेश मंदिराला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी 19 सप्टेंबर रोजी गणेश मंदिरासाठी भजन सामग्री करिता 30,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

या आर्थिक मदतीतून गणेश मंदिराला भजनासाठी तबला, पेटी, टाळ, डमरू इत्यादी साहित्य घेण्यात आले. यावेळी सिरोंचा येथील गणेश भक्त व भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, रंगू बापन्ना, सितापट्टी गट्टू, दिलीप शेनीगारपू, सतीश पदमटिटी, श्रीधर आणकारी, रमेश मुंगीवार, नागेश ताडबोईना, सत्यनाराण आईला, राजू पेंदापल्ली, सतीश गट्टू आदी कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!